Skip to content

Sorry ,We couldn't save you...

By Naren Narole

या ब्लॉगमध्ये जे काही लिहिले गेले आहे ते कोणत्याही व्यक्ती, जाती, धर्म किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. हे भारतीय जनते समोर उदभवत असलेल्या बर्‍याच प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. जे सर्व देशवासीयांचे मन किंवा मेंदू ला  हादरवून टाकते .

या जगात येण्याने  सर्वांना आनंदची बातमी देणारा प्रसंग  अचानक  झालेल्या अपघाता मुळे सगळ्यांना दुःखद वार्ता देणारा झाला . भंडारा जिल्हा इस्पितळात  दहा नवजात बालकांचा हृदयविदारक मृत्यू झाला .त्या सर्व बालकांना ,त्यांच्या पालकांना ,आम्हाला माफी मागायची आहे .

आम्ही आमच्या मुलांना पुन्हा वाचवू शकलो नाही. आम्हाला माफ करा. हा ब्लॉग त्यांच्या  आठवणीत लिहिला आहे . आपण त्यांना वाचवू शकलो असतो हे  लक्षात घेण्यासाठी ,आम्ही सर्व कसे अयशस्वी झाले याचा अनुभव घेण्यासाठी लिहिले आहे.

आपल्याला आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल तरच आपण असा अपघात थांबवू शकतो. जर या ब्लॉग मुळे कोणाचीही , कोणत्याही प्रकारे मन दुखावले गेले असेल तर त्या बद्दल क्षमा करावी . आमचा तास काही हेतू नाही आहे.

चिमुकल्यानो आम्हाला माफ करा-भंडारा जिल्हा रुग्णालय अपघात -10/01/2021 

आपल्या  सर्वांसाठी एक दुःखद बातमी म्हणजे ,शुक्रवार – शनिवारी रात्री चा  दीडच्या सुमारास भंडारा जिल्हा हॉस्पिटलमधील सीक न्यू बोर्न केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) अचानक आग लागली.

या अपघातात 10 नवजात मुलांचा मृत्यू झाला . प्राथमिक तपासणीत तीन मुलांचा जळून तर सात मुलांचा  श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या नवजात मुलांमध्ये आठ मुली आणि दोन मुले असल्याचे वृत्त आहे.

सात नवजात या अपघातात बचावले आहेत . या अपघातात दोन महिला आरोग्य कर्मचारीही गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताचे कारण सध्या इलेक्ट्रिक  शॉर्ट सर्किट मानले जात आहे.

असे अपघात आपल्या कडे  बर्‍याच वेळा घडले आहेत. प्रत्येकजण जीव हानी झाल्याने दुःख  व्यक्त करतो आहे.

काही दिवसं आगोदर  गुजरातमधील आगीच्या  घटना पाहून  भारतीय सुप्रीम कोर्टाने हॉस्पिटलमध्ये अग्निसुरक्षा आणि अग्निशमन अधिकारी असले पाहिजेत अशी मार्गदर्शक सूचना प्रत्येक राज्यांना दिली होती. तसे न झाल्यास राज्य सरकारने कारवाई करावी अशी सूचना देण्यात आली होती. परंतु आमच्याकडे कामाचा एवढा ओढा आहे की सामान्य माणसे मेल्या शिवाय कोणीही अशा मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष दिले जात नाही

. आता सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. दोषींवर मोठी कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या अपघाताबद्दल राज्य आणि देशातील सर्व राजकारण्यांनी हळहळ  व्यक्त केली आहे आणि पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

राज्य सरकारच्या आरोग्यमंत्र्यांनी मृतक मुलांच्या कुटूंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. विरोधी पक्षाच्या राजकारण्यांनी असे सांगितले आहे की रुग्णालयासाठी अग्निशमन यंत्रणा प्रस्तावित होती, ज्यास आताच्या सरकारने मान्यता दिली नव्हती.

 

पुन्हा अपघातावरुन राजकारण होईल. विरोधकांचे काम  सरकारला दोष  देणे ,आणि विरोध करणे  हे ते नक्कीच करतील .जेव्हा हा विरोधक सत्तेत असतो तेव्हा ते देखील असेच करतात जे हे सरकार करत आहे. 

केवळ एक आईच आईच्या वेदना समजू शकते जा  बाळाला आपल्या गर्भात नऊ महिन्यांपर्यंत वाढविले ते बाळ जन्म घेतल्यावर अश्या प्रकारे मृत्यूस समोर गेले . परंतु सामान्य लोकांचे त्रास सामान्य आहेत. मोठे लोक आपल्या मुलांसाठी काय करत नाहीत. जरी जीवन अनमोल आहे परंतु सरकार काही रुपयांचे नुकसान भरपाई देते आणि त्यांचे दुःख संपवते .

 राजकारणी  लोक देखील आपल्या मुलांना सामान्य मुलां प्रमाणेच ठेवतात. राजकारणी लोक हे किती सामान्य लोक असतात हे आपण सर्वांनी पाहिले आहे. 

जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी सरकारी  मंत्र्यांचा राजीनामा मागितला  आहे ,आणि सरकार नि लाखोंऐवजी प्रत्येकी एक कोटीची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. सरकार काय बोलेल आणि विरोधी काय म्हणतील हे सर्वसामान्यांनी पुन्हा पुन्हा पाहिले आहे.

आमच्याकडे वेगवेगळ्या सरकारी किंवा खासगी सुविधा आहेत. आपल्या प्रत्येक क्षेत्रातील ही परिस्थिती आहे. सरकारी यंत्रणा सर्वसामान्यांसाठी आहे, सामान्य लोक मोठ्या संख्येने आहेत आणि मुळात ते गरीब किंवा मध्यमवर्गीय आहेत. त्यामुळे त्यांना खासगी सुविधा मिळू शकत नाहीत. 

खासगी सुविधा ही सामान्यत: श्रीमंत लोकांची असतात. पण जेव्हा सरकारी नोकरी आणि खासगी नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. सरकारमंत्री पदासाठी राजकारण्यांमध्येही बरीच स्पर्धा होईल. लोकांना फक्त सरकारी शाळा, सरकारी रुग्णालये किंवा सरकारी योजनांमध्ये त्रास होतो.

जेव्हा खाजगी रुग्णालय बनत असते  त्यात खूप साऱ्या लोकांचा सहभाग असतो . त्या रुग्णालयातुन  मिळणाऱ्या नफायात सुद्धा सर्वांचा वाट असतो .  असे खाजगी  रुग्णालय पूर्ण सुविधे शिवाय चालूच होत नाही . खाजगी रुग्णालय पूर्ण झाले कि मोठी राजकीय व्यक्ती  तिचे उद्घाटन करतो .  सर्व सुविधांसाठी खाजगी रुग्णालयात   एक चांगले बिल सुद्धा द्यावे लागेल . 

परंतु सरकारी रुग्णालयात तसे काही नसते . सुविधा या टप्या टप्यात येतात .भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात सन 2015 पासून  सीक न्यू बोर्न केअर युनिट (एसएनसीयू) चालू आहे .  म्हणजे, तेव्हापासून हे रुग्णालय अग्निसुरक्षे शिवाय सामान्य लोकांसाठी कार्यरत आहे. जर सरकारी  अधिकारींनी जर  किमान असे सांगितले असते कि  सुरक्षा व्यवस्था  नसल्याने सीक न्यू बोर्न केअर युनिट  ची सुविधा  आपण सध्या देऊ शकत नाही . एसएनसीयू  सॊडून बाकी सर्व साधारण सुविधा मिळतील  तर सर्वसामान्य  लोकांनी आपल्या मुलांना दुसऱ्या इस्पितळात नेऊन त्यांचा जीव वाचविला असता .

परंतु सुरक्षा व्यवस्था नसताना एसएनसीयू ची सुविधा देणे हे किती धोकादायक आहे हे सगळ्यांना दिसून आले .  आपल्या सर्वांसाठी हा धडा आहे. आपल्या स्वतःला सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागेल.सरकार हि फक्त कर संकलन करणारी एजन्सी आहे. ज्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो . सरकार चालविण्यासाठी लागणाऱ्या कामासाठी राजकारणी लोक आपला वाटा घेऊन  सुखी आयुष्य जगतात. ही भारतीय लोकशाही आहे.