सुशांत सिंग राजपूत.....मला फार राग आला आहे तुझा .....
By Naren Narole
जीवनात आपण सगळे जेव्हां कुणाला थोडे नीट पाहतो तेव्हा आपण थोडेफार अंदाज नेहमीच लावत असतो की हा असा असेल ,असे वागतो ,असे बोलतो याला हे काही जमणार नाही ,हे तर तो कधीच करू शकणार नाही किंवा हे तर तो मिळवूच शकणार नाही,यांनी हे करायला हवे ते नको,कधी थोडा हुशार पण वाटतो (खर तर आपण कुणाला आपल्या पेक्षा हुशार कधीच मानत नाही), किंवा हा तर नक्कीच वेगळा आहे ,हा फार मोठा माणूस होईल वगैरे वगैरे ….
वर सांगितल्या प्रमाणे ,माझी एक सवय आहे जी मी कधीही कुठल्या नवोदित कलाकारांचा चित्रपट किंवा टीव्हीवर येणारी मालिका पाहिली की तो किती यशस्वी होईल हे भाकीत (अंदाज) लावित असतो ,लगेच घरातल्या मंडळींना सांगत असतो ,आणि जर का आपल्या मनासारखे झाले तर तो आनंदच जगावेगळा . शाहरुखखान ला प्रथम टीव्हीमालिकेत,अक्षयकुमार,ह्रितिक रोशन आणि रणविर सिंगला प्रथम चित्रपटात पहिले तेव्हा लगेच घोषणाच केली कि हे नक्कीच सुपरस्टार होतील .शाहरुख , अक्षय ,ह्रितिक तर झालेच आणि रणविर ही होईलच. भाकिता नुसार या क्षेत्रात जे फार थोडा वेळ कलाकार म्हणून वावरतील ,आणि त्याची प्रचिती आल्यावर त्यांच्या बद्दल लिहिणे शेवटी चुकीचे ठरेल ,कुणाचे मन दुःखवायला नको ,तुम्हाला माझी एकंदर सवय कळणे हा उद्देश एवढंच !
पहिल्यांदा सुशांत सिंग राजपूतला ‘ मानव ‘ या भूमिकेत टीव्हीमालिकेत पाहिले आणि माझे जे पहिले भाकीत होते कि , हा नेहमीच टीव्हीमालिकेत दिसणार आणि मालिकेच्या हिरोईन सॊबत लग्न करून एक यशस्वी टीव्ही कलाकार म्हणून आपले जीवन जगणार. इतर मालिकांप्रमाणे ती मालिका मी काही जास्त दिवस पाहिली नाही . सुशांत, मानवाच्या भूमिकेत एक निरागस सुंदर आणि सुसंस्कृत असा मुलगा वाटला . माझे पहिले भाकीत काहीच दिवसात सुशांतने मोडून टाकले .मी त्याला टीव्हीवर एका नृत्य कार्यक्रमात (डान्सशो) मध्ये पहिले ,त्याच्या कामगिरीने माझे भाकीत मनातल्या मनातच आता ५० % सुधारित झाले होते .
सुशांत बद्दल जेव्हढे कळत गेले ,त्याचा अभिनय आणि नृत्य मध्ये असलेले प्राविण्य ,त्याची माणसांपासून तर प्राण्यांशी असलेली माणुसकी ,त्याने कमी वेळेत केलेली अफाट मेहनत आणि मिळवलेले यश हे माझेच काय तर सर्वांचेच डोळे त्याचाकडे एक उद्याचा भावी सुपरस्टार् म्हणून पाहू लागले ,त्यात तो कुणालाच कमी पडणारा नव्हता . सुशांत कधीच हरणार नाही, तो शेवट पर्यंत लढणार , खूप लोकांपुढे एक आदर्श ठेवणार . त्याचे जे काही जीवनातील उद्देश्य आहे ते तो पूर्ण करणारच, खूप नवोदितांचा मार्गदर्शक बनणार हे माझे दुसरे भाकीत .
वर सांगितल्या प्रमाणे ,माझी एक सवय आहे जी मी कधीही कुठल्या नवोदित कलाकारांचा चित्रपट किंवा टीव्हीवर येणारी मालिका पाहिली की तो किती यशस्वी होईल हे भाकीत (अंदाज) लावित असतो ,लगेच घरातल्या मंडळींना सांगत असतो ,आणि जर का आपल्या मनासारखे झाले तर तो आनंदच जगावेगळा . शाहरुखखान ला प्रथम टीव्हीमालिकेत,अक्षयकुमार,ह्रितिक रोशन आणि रणविर सिंगला प्रथम चित्रपटात पहिले तेव्हा लगेच घोषणाच केली कि हे नक्कीच सुपरस्टार होतील .शाहरुख , अक्षय ,ह्रितिक तर झालेच आणि रणविर ही होईलच. भाकिता नुसार या क्षेत्रात जे फार थोडा वेळ कलाकार म्हणून वावरतील ,आणि त्याची प्रचिती आल्यावर त्यांच्या बद्दल लिहिणे शेवटी चुकीचे ठरेल ,कुणाचे मन दुःखवायला नको ,तुम्हाला माझी एकंदर सवय कळणे हा उद्देश एवढंच !
सुशांत सिंग राजपूत , कुशाग्र बुद्धी असलेला अभिनय पारंगत आणि विविध कला गुण जोपासणारा, एक युवा कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीला लाभला होता , ‘होता ‘ हे लिहीण्यास मन मानत नाही . लॉकडाऊन मुळे संथ पणे जात असलेल्या दिवासत अचानक मोबाईल वर सुशांतविषयी बातमी आली आणि मन अशांत झाले.
सुशांतने माझे दुसरे भाकीत मोडले ,त्याचे असे निघून जाणे हे फारच दुःखद आहे ,किंबहुना विश्वास करण्या पलीकडे आहे . मृत्यू हा आत्महत्या आहे असे कितीही सांगितलं तरीहि , त्याचा प्रशंसकांना हा जास्त खून आहे असेच वाटते . सुशांतला, जर मानसिक आजार असता तर ते त्याचा वागणुकीतून दिसून आले असते,जसे बहुतांश डिप्रेस्ड लोकांमध्ये पाहायला मिळतात. जसे ते जास्त दारू किंवा नशेचे पदार्थ अतिसेवन करतात. ते विचीत्र वागतात त्यांना काही भान नसते किंवा त्यांच्या कामा मध्ये त्याचे पडसाद दिसतात ,पण अशा आशयाच्या बातम्या ह्या पुर्वी कानावर कधी आल्या नव्हत्या .
सुशांत या पुर्वी ‘ छिछोरे’ सारखा चित्रपट करतो, त्यात तो प्रेक्षकांना उत्त्तम संदेश देतो ,की लढायचे असते. आज जर हरलो असेल तर हा काही शेवट नाही आणि स्वतःच तसाच शेवट करून निघून जातो हे कोणाचेच मन मानत नाहीच. तो स्वतःहून काही कारणांस्तव गेला असता तर काही तरी कमीतकमी लिहून गेला असता ,जामुळे त्याच्या जाण्याचे कारण तर कळले असते . पुढे आलेले पुरावे आणि त्याचा सॊबतच्या लोकांची वागणूक रहस्यमयी आहे .
सुशांत कडे भरपूर कार्यक्षेत्रांमध्ये स्वतःला सामावून घ्यायची क्षमता होती. त्याची आर्थिक परिस्तिथी ही एका श्रीमंत व्यक्ति ला साजेशी होती . सुशांतला भीक लागली नव्हती आत्महत्या करायला . डिप्रेशन ,मानसिक आजार हे कारण पुढे केल्या जात आहेत ,खरच सुशांत मानसिक आजारी होता,की त्याला कोणी सुचवले कि तो मानसिक आजारी आहे, औदासिन्यतेने ग्रसित आहे ,हा सुधा शोधाचा विषय आहे. असले त्रास आपल्या सॊबतचे मित्र अनुभवतात आणि असे त्रास हे बहुतेकदा आपल्या चर्चेचे विषय असतात. अनेक वेळा आपणपण दुसऱ्याला पॉझिटिव्हिटी बद्दल सल्ले देत असतो.
जीवनमार्गात आपणही कधी तरी खचून तसा अनुभव घेत असतो . बहुतेक वेळा आपण आपले अनुभव आपल्या मित्रांच्या जीवनाशी तुलना करतो . मित्रानेच सांगितले म्हणून आपण पण तसा विचार करतो आणि हे जर सातत्याने होत राहिले तर आपण नक्कीच मित्राने सुचविल्या डॉक्टर कडेच जातो . डॉक्टर्स त्यांचा अनुभवानुसार नुसार पेशंटचा उपचार करत असतात परंतु पेशंट त्याचा मानसिक त्रासाने आणखी गुरफटत जातो ,ह्यात त्याचा स्वतःच्याच मेंदूशी वाद चाललेला असतो . असले मानसिक आजार एखाद्या नॉन्स्ट्रगलरला जास्त होणाची शक्यता असते , परंतु सुशांत हा नॉन्स्ट्रगलर नव्हता .
सुशांत एका वर्षाहून कमी वेळातच मानसिक त्रासाला हरून ,खचून जाईल आणि तो एव्हढ्या लवकर त्या कारणांवर मात न करता एक्झिट घेईल असे वाटतच नाही. सुशांत नेहमीच त्याचे विचार लिहून ठेवत असे . ती त्याची सवय होती मग त्याने त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल ,त्यांचे कारणाबद्दल काहीच का लिहिले नाही .बॉलीवूड मधील बहुतांश लोकांना आर्थिक,वैचारिक किंवा इतर बुद्धिमत्ता ही आऊटसोर्स करावी लागते कारण ते त्यांचे कार्यक्षेत्र नसतेच ,परंतु त्याच्या बुद्धिमत्तेनुसार ,स्वभावानूसार त्याने त्याचे कारण नक्कीच लिहून ठेवले असते आणि इतर लोकांना सावध केले असते. हे सगळे विचार निराश करणारे आहे .
सुशांतच्या मृत्युपूर्वी CCTV बंद राहणे ,रूमची डुप्लिकेट चावी न दिसणे ,गळ्या भोवती V- shape व्यतिरिक्त दुसरीच खून दिसणे ,त्याचा डोळयाचे किंवा जिभेचे बाहेर न येणे ,त्याला फासावर लटकलेले पोलिसांनी न पाहणे ,त्याचे ज्यूस पिऊन दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाका बद्दल विचारणे ,रूमचा आणि त्याच्या ऊंचीचा विचार न करता आत्महत्या असल्याचे सांगणे ,त्याचे ५० च्या वॉर सिमकार्ड बदलविणे ,त्याच्या मैत्रिणीचे संशयास्पद वागणे आणि आर्थिक व्यवहारतील सहभाग लपविणे या एकंदरीत गोष्टी संशय वाढवितात .
नातलगत्व (नेपोटीझम) बद्दल बोलायचे तर ते सगळीकडेच असत. कुणीही पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि वाटेल ती मदत करतात . पण त्या करिता कोण्या दुसऱ्यांचे पाय ओढणे हे बरोबर नाही . परंतु सुशांत ला त्याचे व्यक्तिमत्व आणि गुण पाहता तो नातलगत्व (नेपोटीझम )किंवा ग्रुपिझम मुळे स्वतःला संपविले असेल तर शक्यच वाटत नाही .एकंदरीत हे शक्यच नाही की सुशांत सिंग राजपूत हा आत्महत्या करेल .हे सुनियोजित षडयंत्र आहे असेच वाटते .
हे प्रकरण CBI ला तपासणीला दयावे असे त्याचा चाहत्यांना किवा सामान्य लोकांना वाटते ,परंतु जे हे करू शकतात त्याना असे वाटत नाही हा एक प्रश्नच आहे ,त्यांच्या कुटुंबात असे कही घडले असते तर तेव्हा त्यांना ही आत्म्हत्याच आहे असे वाटले असते का ? की हे विरोधी राजनितिक गटाचे कारस्थान आहे असे वाटले असते। ‘जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे ‘अशी एक म्हण आहे ती खरी !
सत्तेवर असणाऱ्या पक्षानी सामान्य लोकांच्या भावना समजून निर्णय घेणे हे सोयीस्कर असते ,शेवटी सत्ता ही कायम नसते ,परंतु जनता मात्र तीच असते . काही लोकांचा मृत्यु हा काही दिवस डोक्यात राहतो आणि निघून जातो परंतू सुशांत सिंग राजपूत ला डोळे अजूनही शोधत आहेत ,किंबहुना शोधत राहतील .